Saturday, June 5, 2021

कविता : वाट पाहणं!

कुणाचीही वाट पाहणं मोठं जीवघेणं असतं!
नक्की कुण्या जन्माचं राहिलेलं देणं असतं!!

कवितेची ओळ साधी, हवी तेव्हा स्फुरते का?
डोळ्यांपुढे झोपसुद्धा नको तेव्हाच येते ना? :)
हटखोर वळवासारखं यांचं येणं असतं..

वळवाचं काय म्हणा, त्याचं कामच भिजवण्याचं!
गारव्याची आस, पुन्हा हृदयात जागवण्याचं!! :)
आणिक हवं असण्याचं, दु:ख नेहमी दुणं असतं..

ज्याच्यासाठी जगतो आपण, त्याच्याविना जगतो(च) का पण?
इवलासा प्रश्न आता एवढा मोठ्ठा वाटतो ना पण? :)
त्या अनामिक ओढीचंही आपल्याकडून नेणं असतं..

[ २०१० ]

राघव


No comments:

Post a Comment

स्वप्नजा !

  कोण तू, माझी कुणी आहेस का? स्वप्नजा.. जागेपणी आहेस का? त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी.. ब्रह्मकमळाची सखी आहेस का? चाल नुपुरांची किती अलवार...