संवादावे कसे? उभयतां ठाऊक नाही!
संवादाचा वाद कशाला? ठाऊक नाही! 🙂
तिच्याचसाठी सर्व करावे.. आंस मनातील!
सर्वव्यापी ती उर्मी कुठली? ठाऊक नाही! 😎
प्रेमासाठी झुरणे म्हणजे प्रेम म्हणावे??
प्रेमाचा मज अर्थ मुळातच.. ठाऊक नाही! 😏
धरणीसाठी अमृत होतो पाऊस, तेव्हा..
कधी संपला विरहग्रीष्म, तिज ठाऊक नाही! 😊
तेल-वातीच्या जळण्यामधुनी ज्योत तेवते..
पतंगांचे महत्त्व तिज मग.. ठाऊक नाही!! 🔥
प्रत्येकाचा कृष्ण, मनांतील, सांगत असतो..
ईश-प्रेमाला अंतर कुठले ठाऊक नाही!! 😇
--
रतीब आहे शब्दांचा पण अर्थ निसटतो..
ह्या कवितेला शब्द बंधने.. ठाऊक नाही! 😉
राघव
टीप : ही रचना मिपा दिवाळी अंक २०२० मधे प्रसिद्ध.
[ २०२० ]
No comments:
Post a Comment