Saturday, June 5, 2021

कविता : उरला पलाश आता..

सगळीच राख येथे.. दिसतो विनाश आता..
नुसते वळून बघता तुटतात पाश आता..

पाहून कुंपणा त्या.. जाणीव तीव्र होते;
घर तेवढे निमाले..उरला पलाश आता..

राखेत जन्मणार्‍या पक्ष्यापरी स्थिती..की..
सर्वस्व जाळुनी मज दिसते अकाश आता?

अंधार तेवतांना ठिणगी महाग होती..
डोळ्यांस त्रास होतो दिसता प्रकाश आता...

आसुसल्या मनाला.. कूस तेवढी मिळेना..
आसेतलेच आर्त.. होते निराश आता..

(विषण्ण) राघव

[ २०११ ]

No comments:

Post a Comment

स्वप्नजा !

  कोण तू, माझी कुणी आहेस का? स्वप्नजा.. जागेपणी आहेस का? त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी.. ब्रह्मकमळाची सखी आहेस का? चाल नुपुरांची किती अलवार...