Saturday, June 5, 2021

कविता : वादळ उगा निमाले..

छंदात मांडते ती, शब्दार्थ जाणीवेचा..
कवितेस ना कळाले, "स्व"-रूपात काय होते!

जागून शब्द गेले..लिंपून आस गेली..
ते दग्ध वासनांचे उसनेच पाय होते..

आक्रंदतात सारे, जड-सोबती जीवाचे..
जन्मांतरी न तुटले, ते पाश काय होते?

वादळ उगा निमाले पणतीस पाहण्यासी..
आता फिरून उठणे, कष्ट:प्राय होते..!

--

माझ्यासवेच होते, मय-विश्व कल्पनांचे..
पण प्रेरणा कुणाची? ते भाव काय होते??

राघव

[ २०१७ ]

No comments:

Post a Comment

स्वप्नजा !

  कोण तू, माझी कुणी आहेस का? स्वप्नजा.. जागेपणी आहेस का? त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी.. ब्रह्मकमळाची सखी आहेस का? चाल नुपुरांची किती अलवार...