Saturday, June 5, 2021

कविता : मन! - २

मन दु:खाचा तरंग.. मन सुख, अंतरंग..
जसा फणसाचा गर.. कठीणात मऊसर!

मन अप्राप्य सागर.. अंतहीन कुतूहल..
जसा सुगंध अल्लड..शब्द-रूपाच्या पल्याड!

मन अस्तित्व प्रचिती..मन फक्त विसंगती!
जशी रात, न्हायलेली, चांदण-प्रकाशाच्या ज्योती!!

मन शब्दांची आरास..कल्पनांचा सहवास!
जशी सावली सजग..अव्यक्ताचं व्यक्त जग!!

--

मनी मनाचा विचार.. स्वत्व शोध.. निरंकुश!
मन आनंद केवळ.. डुंबण्याचा अवकाश!!

राघव

[ २०१८ ]

No comments:

Post a Comment

स्वप्नजा !

  कोण तू, माझी कुणी आहेस का? स्वप्नजा.. जागेपणी आहेस का? त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी.. ब्रह्मकमळाची सखी आहेस का? चाल नुपुरांची किती अलवार...