Saturday, June 5, 2021

कविता : क्षण...

क्षण कोवळ्या उन्हाचा लेवून नीळकंठी..
अवकाश व्यापणारी दृष्टी कुठून येते?

जन्मांत गांठ जुळण्या क्षणमात्रही पुरेसा..
मग रुक्ष भावनांची गर्दी कुठून येते?

स्वप्नांस जागवी जो.. क्षण तोच अंतरंगी
निमिषात सर्वव्यापी ऊर्मी कुठून येते?

अवशेष संस्कृतीचे दिसतात जागजागी..
क्षणात शेवटाची प्रगती कुठून येते?

--

एका क्षणात सारे लाघव्य संपलेले..
शब्दांस धार माझ्या इतकी कुठून येते?

राघव

[ २०१६ ]

No comments:

Post a Comment

स्वप्नजा !

  कोण तू, माझी कुणी आहेस का? स्वप्नजा.. जागेपणी आहेस का? त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी.. ब्रह्मकमळाची सखी आहेस का? चाल नुपुरांची किती अलवार...