स्वार्थामधेच सारा आनंद मानतो मी!
नि:स्वार्थ म्हणविणारा नसत्या भ्रमात आहे!
ऐसे अनेक आले.. आले तसेच गेले..
माझी इथेच सत्ता तरीही भरात आहे..
संतांस काय जाते नीती जपा म्हणाया..
नाही सुखास म्हणणे अवसानघात आहे
धर्म-अधर्म सारे कोळून प्यायलो मी..
आता मिजास माझी.. तुमची वरात आहे..
--
चघळून रक्त अपुले, कुत्रा सुखावतो ना?
आमीष हाडकाचे.. अन् मी सुखात आहे!
राघव
[ २०१२ ]
No comments:
Post a Comment