Saturday, June 5, 2021

कविता : प्रेमे नादली पंढरी..!

आषाढी एकादशीला ही कविता लिहिलेली. लिहिल्या गेल्यावर माझा मलाच खूप आनंद झाला होता. :)

मेघ आषाढाचा गर्जे, गाज गूंजे चराचरी,
प्रेमे नादली पंढरी उभा बघून श्रीहरी!

मी बालक अजाण मन सोडीना पदर!
माझी बालकाची मती त्यास कोठला आधार?

दिंडी चालली माहेरा, वाट ओली अंतरीची!
उभी लेकराच्यासाठी माय सावळी कधीची!!

अश्रू वाहती सहज, भाव कोवळा सांभाळा!
मायभेट उराउरी आज आनंद सोहळा!! 
 

[२००८]

राघव

No comments:

Post a Comment

स्वप्नजा !

  कोण तू, माझी कुणी आहेस का? स्वप्नजा.. जागेपणी आहेस का? त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी.. ब्रह्मकमळाची सखी आहेस का? चाल नुपुरांची किती अलवार...