Saturday, June 5, 2021

कविता : माझी विठ्ठल माऊली..

 

आज सकाळ पासूनच सतत विठ्ठलाची मुर्ती डोळ्यांपुढे येत होती. म्हटले आज आपल्या हातून माय काहीतरी लिहून घेणार.. नक्की!
तशा २-३ ओळी काल-परवा कडेच मला सुचल्या होत्या पण लिहून काढल्या नव्हत्या! आज मात्र दिवसभरात येवढे लिहून झाले माझ्याकडून.. भगवंताचीच कृपा.. नाही? :)

मला भावतो गजर तुझ्या नामाचा-प्रेमाचा..
तुझ्या सगुण रुपात मला निर्गुणाची ओढ!

काय वर्णावे तत्वांस साधे रूप वर्णवेना!
माझ्या डोळ्यांत मावतो प्रेम-अश्रुंचा सागर..

कुणा तुझ्यात दिसतो सार्‍या विश्वाचा नियंता..
कुणी तुझ्यात पाहतो काळा दगड केवळ!!

तुला खंत ना तयाची, हसु निर्मोही तसेच!
सार्‍या लेकरांस मिळे तुझ्या मायेची पाखर!

माय-बाप रघुवीर माझी विठ्ठल माऊली..
तिच्या चरणांशी माझे मन आनंदी, अचळ!


[ २००८ ]

राघव

No comments:

Post a Comment

स्वप्नजा !

  कोण तू, माझी कुणी आहेस का? स्वप्नजा.. जागेपणी आहेस का? त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी.. ब्रह्मकमळाची सखी आहेस का? चाल नुपुरांची किती अलवार...